शिमला : शिमल्यामध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम तिथल्या जनजीवनावरही झाला आहे. जवळपास दोनशे पर्यटक हे बर्फवृष्टीमुळे नारकंड्यामध्ये अडकले आहेत. या बर्फवृष्टीमुळे ट्रॅफिक, टेलिफोन, वीज आणि पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. दुध, भाज्या आणि फळं शिमल्यात पोहोचण्यासाठीही अडचणी येत आहेत. शिमला आणि भुटंरमध्ये पारा 0.2 अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर तिकडे जम्मू काश्मीरमध्ये हिमवादळाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. काश्मीरमध्ये सलग पाचव्या दिवशी बर्फवृष्टी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद करण्यात आलाय. हवाई वाहतूकही ठप्प झालीये. श्रीनगरकडे येत असलेली वाहनं अवंतीपोरा, अनंतनाग आणि काजीगुंड इथं तर जम्मूहून श्रीनगरकडे जाणा-या वाहनांना नगरोटा इथं थांबवण्यात आलंय.