मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमीपूजन आणि विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवारी झाला.. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मात्र शिवस्मारकाच्या भूमीपूजनावेळीसुद्धा मोदी आणि उद्धव यांच्यात संवाद काही दिसला नाही. त्यानंतर हे दोन्ही दिग्गज बीकेसीतल्या कार्यक्रमात एका व्यासपीठावर आले.


जवळपास 2 तास हा कार्यक्रम सुरु होता. अनेक नेत्यांची भाषणंही झाली. मात्र या सगळ्या काळात पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे दोघंही एकमेंकांना टाळत असल्याचंच दिसून आलं.जाहीर सभेत मोदींनी उपस्थित असलेल्या नेत्यांची नावं घेताना  ठाकरे किंवा शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही.


उलट चलनशुद्धीला विरोध करणाऱ्यांना मोदींनी चांगलंच खडसावलं.उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्यावर मोदी बोलले नाहीत. त्यामुळं सत्तेत एकत्र नांदणारे मात्र कितने दूर कितने पास आहेत हे दृष्यांमधून स्पष्ट दिसून आलं.


तर दुसरीकडे पुणे मेट्रोच्या पायाभरणी निमित्त आयोजीत सभेत मोदींनी स्वत: शरद पवारांजवळ जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.. शिवाय हस्तांदोलन केलं.


इतकच नव्हे तर भाषणात शरद पवारांच्या 50 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीचा गौरवही केला. कार्यक्रम संपल्यानंतर मोदींनी पुन्हा पवारांची भेट घेत त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. 


शरद पवारांना महत्त्व देणाऱ्या मोदींनी मुंबईतल्या सभेत उद्दव ठाकरेंना तेवढं महत्व न दिल्यानं ही बाब शिवसैनिकांना चांगलीच खटकली