नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाला मोठा झटका बसला आहे. शिवपाल सिंह यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे कॅबिनेटमंत्री पदाचा राजीनामा पाठवला आहे. समाजवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन आणि पक्षाच्या इतर पदांचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे.


उत्तर प्रदेशमध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे अखिलेश कुमारांनाच पक्षाचा चेहरा बनवायचं असं मुलायम सिंह यांच्या नेतृत्वात ठरलं पण हे शिवपाल सिंह यांना खटकलं आणि त्यांनी पक्षात याविरोधात आवाज उठवला. पण अखिलेश कुमार यांनी देखील न झुकण्याची भूमिका घेत अखेर शिवपाल सिंह यांनाच त्यांच्या पदांचा राजीनामा द्यावा लागला. पण यामुळे पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये नुकसान होऊ शकतं हे नाकारता येणार नाही.