पणजी : गोव्यामधली निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांना मिळून ७९२ मतं मिळाली आहेत. गोव्यामध्ये शिवसेनेनं सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचबरोबर युती केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा सुरक्षा मंच, शिवसेना आणि महाराष्ट्र गोमांतक पक्ष यांनी गोव्यामध्ये युती करून ४० पैकी ३५ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. यामध्ये गोवा सुरक्षा मंचचे सगळे उमेदवार पराभूत झाले, तर महाराष्ट्र गोमांतक पक्षानं आता मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आहे.


दरम्यान मनोहर पर्रिकर हे संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन गोव्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून परत येणार आहेत. गोव्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतरही सत्ता स्थापन करता आली नाही. गोव्यामध्ये भाजपला मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे पर्रिकरांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.