मुंबई : मुंबईतल्या तीन रेल्वे स्थानकांची नावं बदलावी या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. एलफिन्स्टन रोडचे प्रभादेवी, चर्नीरोडचे गिरगाव आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नामांतर करावे अशी मागणी या शिष्टमंडळानं केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबरोबरच छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामांतर करण्याची मागणीही शिवसेनेनं केलीय. या शिष्टमंडळात परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत आणि खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश होता.