इस्लामिक बँकेच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध
देशातल्या बँकांमध्ये `इस्लामिक विंडो` नावानं शरियत बँका सुरू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेनं ठेवला आहे.
नवी दिल्ली : देशातल्या बँकांमध्ये 'इस्लामिक विंडो' नावानं शरियत बँका सुरू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेनं ठेवला आहे. शिवसेनेनं मात्र या प्रस्तावाला विरोध केला आहे. बँका सगळ्यांसाठी सारख्या आहेत. शरियत बँका आम्ही सुरु करून देणार नाही असं शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
मुस्लिमांना खुष करण्यासाठी असा प्रस्ताव आला का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याबरोबरच समान नागरी कायद्याची मागणीही त्यांनी पुन्हा एकदा केली आहे.
शरियत कायद्यानुसार व्याज देणं आणि घेणं दोन्ही निषिद्ध असल्यामुळे मुस्लिम समाजातले अनेकजण बँकांमध्ये पैसे टाकत नाहीत. यामुळे मोठ्याप्रमाणावर पैसा अर्थव्यवस्थेमध्ये येत नाही. यासाठी आरबीआयनं शरियत बँका सुरु करण्याचा प्रस्ताव दिला आहे.