विमान कंपन्यांविरोधात शिवसेनेचा हक्कभंग
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवासबंदी घालणा-या विमान कंपन्यांविरोधात शिवसेनेनं लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केलाय.
नवी दिल्ली : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवासबंदी घालणा-या विमान कंपन्यांविरोधात शिवसेनेनं लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केलाय. शिवसेनेचे गटनेते आनंदराव अडसूळ यांनी हा हक्कभंग दाखल केलाय.
यासंदर्भात शिवसेना खासदारांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री गजपती राजू यांच्याशी चर्चा केली. हा प्रस्ताव उद्या चर्चेला येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे गटनेते आनंदराव अडसूळ यांनी कालच याप्रकरणावर लोकसभेत लक्षवेधी मांडली.
बिजनेस क्लासचे तिकीट असूनही इकॉनामी क्लासमध्ये हलवल्यामुळे संतापलेल्या रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिका-याला चपलेने मारहाण केली होती. ते पुण्यावरून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानाने निघाले होते. यानंतर रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी प्रवासबंदी घातली होती.