अरविंद केजरीवालांवर बूटफेक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बूट फेकण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय.
दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बूट फेकण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय. दिल्लीत पत्रकार परिषद सुरू असताना एका तरुणानं त्यांच्या दिशेनं बूट भिरकावला. मात्र केजरीवाल यांच्यापर्यंत हे बूट पोहचलं नाही त्यामुळं ते बचावले.
या घटनेमुळं मात्र पत्रकार परिषदेत एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी वेद प्रकाश नावाच्या या तरुणाला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. वेद प्रकाश हा आम आदमी सेनेचा कार्यकर्ता असल्याचं सांगतो.
तो पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान या घटनेचा काँग्रेस आणि भाजनं निषेध केलाय. मात्र केजरीवाल यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळंच हे घ़डल्याची टीकाही काँग्रेसनं केलीय.
पाहा बूटफेक करतानाचा व्हिडिओ