सियाचीन हणमंतप्पांची चॉईस पोस्टिंग
कर्नाटकमधील धारवाडच्या हणमंतप्पा कोप्पडची सियाचीन ही चॉईस पोस्टिंग होती, असं सांगण्यात येत आहे. हणमंतप्पांना अशी आव्हानं स्वीकारण्यास आवडत होती.
नवी दिल्ली : कर्नाटकमधील धारवाडच्या हणमंतप्पा कोप्पडची सियाचीन ही चॉईस पोस्टिंग होती, असं सांगण्यात येत आहे. हणमंतप्पांना अशी आव्हानं स्वीकारण्यास आवडत होती.
आपल्या १३ वर्षाच्या लष्करी सेवेत त्यांनी १० वर्ष अतिशय कठीण आणि धोकायदायक ठिकाणी काम केलं. हिंसाग्रस्त भागात सेवा देण्यास त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं.
हणमंतप्पा २५ ऑक्टोबर २००२ रोजी भारतीय लष्करात दाखल झाले होते. मद्रास रेजिमेंटची १९ वी बटालियन त्यांनी ज्वाईन केली होती. हणमंतप्पा आधीपासून तंदुरूस्त होते.
जम्मू-काश्मीरमध्ये ते २००३ आणि २००६ मध्ये तैनात होते, त्यांनी दहशतवादी अभियानात सक्रीय सहभाग घेतला. यानंतर ते ५४ राष्ट्रीय रायफल्स - मद्रास-मध्ये सहभाग झाले. २०१० ते २०१२ पर्यंत त्यांनी पूर्वोत्तर राज्यातही सेवा दिली.
नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड आणि युनायटेड लिब्रेशन फ्रंट ऑफ आसाम विरोधातील अभियानातही त्यांचा सहभाग होता. मागील वर्षाच्या ७ ऑगस्टपासून ते सियाचीनच्या ग्लेशियरमध्ये तैनात होते. डिसेंबरमध्येच त्यांनी ठरवलं होतं की जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्रात जायचंय.
शून्य ते ४५ डिग्री सेल्सिअस तापमानात १४४ तास जिवंत राहून हणमंतप्पानी सर्वाना सुखद धक्का दिला होता, कारण बर्फाच्या वादळात ३५ मिनिटापेक्षा अधिक दबणारे २७ टक्के लोकच जिवंत राहिले आहेत.