बंगळुरू : बुटाची लेस बांधण्याच्या मुद्यावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या चांगलेच अडचणीत आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धरमय्या यांचा एक विडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सिद्धरमय्यांच्या बुटाची लेस एक जण बांधत असल्याचं दिसत आहे.


 सिद्धरमय्यांच्या बुटाची लेस बांधणारी व्यक्ती सरकारी कर्मचारी असल्याच्या चर्चेनं, हे प्रकरण विरोधकांनी उचलून धरलं. 


हे प्रकरण चिघळत असल्याचं लक्षात आल्यानंतर सारवासारवी करताना, ती व्यक्ती मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांची नातेवाईक असल्याचं कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.