बंगळुरू : अवयवदानाचं मृत्यूनंतरचं समाधान किती महत्वाचं असतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका विद्यार्थिनीच्या मृत्युनंतर तिच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला, यामुळे ६ जणांना जीवदान मिळाले आहे. 


पुमा या २१ वर्षीय मुलीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. तिचे एका अपघातात निधन झाले. पुमाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. 


पुमाची फुफ्फुसे, मूत्रपिंड, हृदय, त्वचा व डोळे दान करण्यात आली. यामुळे ६ जणांना जीवदान मिळाले आहे. 


अपघातात पुमाच्या डोक्‍याला मार लागला होता. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, डोक्‍याला मार लागल्याने ब्रेन डेड झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले होते.


बंगळूरू येथे राहणारी पुमा आपल्या कुटुंबीयांसोबत मोटारीतून एका कार्यक्रमाला गेली होती. मोटार चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाला अपघात झाला होता.