हल्ल्याचा मोठा कट उधळला, ३ दहशतवाद्यांना अटक
यूपी एटीएससह सहा राज्यांच्या पोलिसांनी देशातील विविध भागातून दहशतवादी कारवायांच्या विरोधात ऑपरेशन सुरु केलं आहे. मुंबई, जालंधर, नरकटियागंज, बिजनौर आणि मुजफ्फरनगरमध्ये ऑपरेशन केलं गेलं.
नवी दिल्ली : यूपी एटीएससह सहा राज्यांच्या पोलिसांनी देशातील विविध भागातून दहशतवादी कारवायांच्या विरोधात ऑपरेशन सुरु केलं आहे. मुंबई, जालंधर, नरकटियागंज, बिजनौर आणि मुजफ्फरनगरमध्ये ऑपरेशन केलं गेलं.
६ राज्यातल्या पोलिसांनी एकत्र येऊन केलेल्या कारवाईत देशात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळून लावलाय आहे. एकाच वेळी केलेल्या ऑपरेशनमध्ये 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तर सहा संशियातांची चौकशी सुरू आहे.
महाराष्ट्र एटीएस, स्पेशल सेल दिल्ली पोलीस, आंध्र पोलीस, पंजाब पोलीस आणि बिहार पोलिसांनी एकत्रितपणे हे ऑपरेशन यशस्वी केलं.