स्मृती इराणींना दुसरा धक्का
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळात बदल केल्यानंतर आता कॅबिनेट समितीमध्येही फेरबदल करण्यात आलेत. स्मृती इराणी, सदानंद गौडा आणि राजीव प्रताप रुडी यांची कॅबिनेट समितीच्या सदस्यपदावरुन हकालपट्टी करण्यात आलीये.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळात बदल केल्यानंतर आता कॅबिनेट समितीमध्येही फेरबदल करण्यात आलेत. स्मृती इराणी, सदानंद गौडा आणि राजीव प्रताप रुडी यांची कॅबिनेट समितीच्या सदस्यपदावरुन हकालपट्टी करण्यात आलीये.
हा नवा फेरबदल म्हणजे स्मृती इराणींसाठी दुसरा धक्का आहे. याआधी मंत्रिमंडळ बदलादरम्यान त्यांच्याकडून केंद्रीय मनुष्यबळ विकास खाते काढून घेत त्यांना वस्त्रोद्योग खाते देण्यात आले. त्या संसदीय कामाकाजाच्या कॅबिनेट समितीमध्ये विशेष आमंत्रित सदस्य होत्या.
कॅबिनेट समितीमध्ये गुरुवारी बदल करण्यात आले. प्रकाश जावडेकर यांना संसदीय सभेच्या समितीचे कायमस्वरुपी सदस्यत्व देण्यात आले आहे. कॅबीनेट सदस्यांची नियुक्ती ही मंत्रीपदावरुन केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे कॅबिनेट समिती सदस्यांची नियुक्ती करणाऱ्या दोन सदस्यीय समितीमध्ये आहेत.