नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही तरी होणार आहे जेव्हा केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी रक्षाबंधनला सियाचिनमध्ये तैनात सैनिकांना राखी बांधायला जाणार आहे. स्मृती इराणी त्यांच्यासोबत ७० शहरांमधील जनतेचे संदेश देखील घेऊन जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉर्डरवर होणार सेलिब्रिटींचे शो


- मोदी सरकारने 70व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 'याद करो कुर्बानी' या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ९ ते २३ ऑगस्ट पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे.


- ७५ केंद्रीय मंत्री स्वतंत्रतेच्या आंदोलनाशी संबंधित कमीत कमी २ ठिकाणांना भेट देणार आहेत आणि शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत.


- सगळे खासदार त्यांच्या मतदारसंघात तिरंगा यात्रा काढणार आहेत. महिला मंत्री बॉर्डरवर तैनात सैनिकांना राखी बांधणार आहेत.


- वेंकैया नायडू यांनी सोमवारी म्हटलं की, उमा भारती, मेनका गांधी या देखील सैनिकांना राखी बांधणार आहेत तर प्रकृती अस्वस्थामुळे सुषमा स्वराज या जाऊ शकणार नाही आहेत. 


बॉर्डरवर होणार कार्यक्रम


- इंडिपेंडेंस डेच्या निमित्ताने आशा भोंसले, कुमार सानू  मनोज तिवारी बॉर्डरवर सैनिकांसोबत कार्यक्रम करणार आहेत.


- सरकारने देशवासियांमध्ये स्वतंत्रता आणि देशभक्तीची भावना मजबूत करण्यासाठी १५ दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.


- भाजपचे खासदार बाईकवरुन तिरंगा यात्रा काढतील आणि सरकारच्या गूड गवर्नेंसचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत.