नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्यावर खोचक टिका करण्याची स्पर्धा लागलेली आहे. राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवलं जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बातमी आल्यावर, 'राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यास भाजपला अच्छे दिन' येतील अशी कोपरखळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लगावली आहे.


राहुल गांधी येत्या महिन्याभरात काँग्रेस अध्यक्षपदी येतील असं एका दैनिकाने म्हटलंय, यानंतर राहुल गांधी यांच्यावर विरोधकांनी गंमतशीरपणे टीकास्त्र उगारण्यास सुरूवात केली आहे.


राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड होणार आहे किंवा नाही, याविषयी काँग्रेसकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.