नवी दिल्ली : बिहारचे शिक्षण मंत्री अशोक चौधरी आणि मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इरानी यांच्यामध्ये चांगलंच ट्विटर वॉर पाहायला मिळाला. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चौधरीने शिक्षण नितीसंबंधित ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी स्मृती इरानींना 'डियर' म्हणून संबोधित केलं यानंतर दोघांमध्ये वाद झाला.


स्मृती इरांनीनी ट्विट केलं की, 'तुम्ही महिलांना डिअर कधीपासून बोलू लागले.' यावर अशोक चौधरी आणखी भडकले त्यांनी म्हटलं की, मी तुमचा अपमान करण्यासाठी डिअर नाही म्हटलं. 'सामान्यपणे बोलतांना व्यक्तीसाठी डिअर शब्दाचा वापर केला जातो.'