कुपवाडा: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत नाशिकचा जवान शहीद झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील भायळे या गावचे शंकर चंद्रभान शिंदे यांना वीरमरण आलंय. कुपवाडा जिल्ह्यातल्या मारसेरी गावात चौकीबाल या भागात काही अतिरेकी दडून बसले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.


 जवानांनी कालपासून या अतिरेक्यांच्या तळाला वेढा घातला होता. अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेनं गोळीबार केल्यानंतर जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. यात शिंदे यांच्यासह 2 जवान शहीद तर एका अधिकाऱ्यासह 1 जवान जखमी झालेय.


दुसरा जवान कर्नाटकातल्या विजापूरचा असून सहदेव मारुती मोरे असं त्यांचं नाव आहे... या चकमकीत पाच अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं.