नवी दिल्ली : भाजपने पहिल्यांदाच आसाममध्ये आपलं सरकार स्थापन केलं आहे, सर्बानंद सोनोवाल भाजपचे आसामधील पहिले मुख्यमंत्री असतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आधी सर्बानंद यांनी एवढी मोठी जबाबदारी पार पाडलेली नाही, केंद्र सरकारमध्ये ते मंत्री होते, ऑल आसाम स्टुडंट युनियन (आसू) सोडून त्यांनी आसाम गण परिषदेत प्रवेश केवा, यानंतर सर्बानंद यांचा १९९८ साली लखीमपूर लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.


यानंतर सर्बानंद २००१ साली पहिल्यांदा मोरानमधून आमदार म्हणून निवडून आले, आणि २००४ मध्ये दिब्रुगड लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. 


मात्र पक्षाने त्यांना कोणतंही महत्वाचं पद न दिल्याने ते २०११ साली भाजपात दाखल झाले. सर्बानंद यांना शोले चित्रपटाचे डायलॉग चांगलेचं पाठ आहेत.