पणजी : गोवा विधानसभेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपतेय. त्यामुळे गोव्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकांकडे दोन विशेष गोष्टी सर्वांचंच लक्ष वेधून घेणार आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे यावेळच्या विधानसभा निवडणुकांसाठी महिलांकरता वेगळी मतदान केंद्र असणार आहेत. तर दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच वोटिंग व्हेरीफाईंग मशीन बसविण्यात येणार आहेत.


मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पणजीत ही माहिती दिली. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने गोव्याचा दौरा पूर्ण केला असून २० फेब्रुवारीनंतर कधीही गोव्याच्या निवडणुका होतील, असा अंदाज आहे. 


विधानसभा निवडणुकांची माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करणाऱ्या विविध उपक्रमाची सुरुवात यावेळी करण्यात आली.