नवी दिल्ली : स्पाईस जेटच्या एका पायलटचे विमान उड्डाणादरम्यान एअरहोस्टेसला कॉकपिटमध्ये बोलवून तिला जबरदस्ती आपल्या बाजूच्या सीटवर बसवल्याच्या आरोपाखाली निलंबन करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२८ फेब्रुवारीला बोईंग ७३७ हे विमान कोलकाता येथून बँकॉकला जात होते. कॉकपिटमध्ये पायलट आणि को-पायलट उपस्थित होते. यादरम्यान पायलटने एअरहोस्टेसला बोलावले आणि आपल्या को-पायलटला बाहेर जाण्यास सांगितले. तसेच को-पायलटच्या जागेवर बसण्यासाठी जबरदस्तीही केली. 


इतकेच नव्हे तर बँकॉकहून परत येतानाही प्रवासादरम्यान पायलटने हाच प्रकार केला. त्या एअरहोस्टेसने तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. या तक्रारीनंतर संबंधित पायलवटर निलंबनाची कारवाई करण्यात आलीये.