नवी दिल्ली : हरित लवादानं सुनावलेला दंड भरणार नाही असं म्हणणाऱ्या श्री श्री रवीशंकर यांची लवादानं चांगलीच कानउघडणी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून नोएडामध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे यमुनेचं प्रदूषण झाल्याचा आरोप झालाय. त्यावर हरित लवादानं संस्थेला दंड ठोठावलाय. हा दंड भरण्यास काल नकार देणाऱ्या श्री श्री रविशंकर यांचीही लवादानं कडक शब्दांत कानउघडणी केलीय... 'तुमच्यासारखी प्रतिष्ठित व्यक्ती असं विधान करते तेव्हा त्याचा कायद्याच्या चौकटीला धक्का बसतो' असं लवादानं म्हटलंय. हरित लवादाला नाहक वादात ओढू नका, असंही आर्ट ऑफ लिव्हिंगला खडसावण्यात आलंय.


 


आजच २५ लाख भरण्याचे आदेश


राष्ट्रीय हरित लवादानं आर्ट ऑफ लिव्हिंगला ठोठावलेल्या ५ कोटींच्या दंडापैकी २५ लाख रुपये आजच भरण्याचे आदेश देण्यात आलेत. उर्वरित रक्कम ३ आठवड्यांमध्ये भरण्यास सांगण्यात आलंय. आज २५ लाख रुपये न भरल्यास केंद्र सरकारनं दिलेलं आडीच कोटींचं अनुदान जप्त करण्यात येईल, असंही लवादानं म्हटलंय.