नवी दिल्ली : लष्कराच्या कारवाईत ठार झालेला हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी याचे वडील मुझफ्फर वानी यांनी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री श्री रविशंकर यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय. मुझफ्फर वानी हे गेल्या दोन दिवसांपासून बंगळूरीमधील आमच्या आश्रमात असल्याचं त्यांनी ट्विट केलंय. 


या दरम्यान त्यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचंही ते म्हणाले. मुझफ्फर वानी हे उपचारासाठी श्री श्री रविशंकर यांच्या बंगळुरुतल्या आश्रमात गेले होते. 



बुरहानच्या मृत्यूनंतर...


बुरहानला ठार मारल्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उफळलाय. यात आतापर्यंत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. काश्मीरमधील अनेक भागांत अजूनही संचारबंदी लागू करण्यात आलीय.


केंद्र सरकारकडून काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुझफ्फर वानी आणि श्री श्री रविशंकर यांची भेट ही खोऱ्यातील शांततेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची मानली जाते.


दरम्यान श्री श्री रविशंकर हे अध्यात्मिक गुरु आहेत त्यामुळे त्यांची कुणीही भेट घेणं गैर नसल्याचं राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटलंय.