मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने एक नवीन मोबाईल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे ग्राहकांचा बँकेत गेल्यानंतर रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचणार असल्याचा दावा बँकेचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्टेट बँके ऑफ इंडिया नो क्यू' असे या नव्याने लाँच केलेल्या मोबाईल अॅपचे नाव आहे. यामुळे ग्राहकांचा अमूल्य वेळ वाचू शकेल, असा दावा भारतीय स्टेट बँकेने केला आहे. भारतीय स्टेट बँकेच्या चेअरपर्सन अरुंधती भट्टाचार्य यांनी मुंबईत हे अॅप लाँच केले.


बँकेने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, या अॅपच्या मदतीने बँकेचे ग्राहक भारतीय स्टेट बँकेच्या काही निवडक शाखांमध्ये विविध सेवांची आणि त्या घेण्यासाठी लागणाऱ्या वेळाची माहिती करुन घेऊ शकतात. ग्राहकांना रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही. बँकेच्या सर्व कारभारांचा समावेश या अॅपमध्ये केला गेला आहे.


अँड्रॉइडसाठी गूगल प्ले स्टोअर आणि आयफोन यूझर्सना अॅप स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करता येईल.