श्रीनगर : जम्मू - काश्मीरची परिस्थिती किती बिकट बनलीय हे विदारक सत्य दर्शवणारी ही घटना... दगडफेक करणाऱ्यांनी शहीद जवानाच्या अंत्ययात्रेवरही दगडफेक केल्याची घृणास्पद घटना समोर आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, शहीद जवान लेफ्टनंट उमर फयाज यांच्या अंत्ययात्रेलाही दहशतवाद्यांनी टार्गेट केलं. कुलगाममध्ये फयाज यांचं शव दफनविधीसाठी नेलं जात असताना दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर सेना आणि सरकारशी निगडीत लोकांचा किती तिरस्कार या भागात केला जातोय, हे लक्षात येईल. सेना आणि पोलिसांच्या नोकऱ्यांपासून स्थानिकांनी दूर राहण्याचा संदेश दहशतवाद्यांकडून अशा पद्धतीनं दिला जातोय. 


नुकतंच जम्मू काश्मीरच्या पोलिसांच्या डीजीपीनंही पोलीस कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना धोक्याची सूचना दित आपल्या घरी न जाण्याचा सल्ला दिला होता. काही पोलिसांच्या घरावर दहशतवाद्यांचा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी हा सल्ला दिला होता. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी पोलिसांचे खबरी म्हणून काम करण्याच्या संशयावरून काही तरुणांना बेदम मारहाण करत त्यांचे केसही कापून टाकले होते.


फयाज यांच्या प्रेतयात्रेवरही दगडफेक

अपहरण आणि हत्या


अखनूर युनीटमधील लेफ्टनंट डॉ. उमर फयाज हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. यावेळी लग्नमंडपातून त्याचे दहशतवाद्यांनी अपहण केले. त्यानंतर शोपियान भागात त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचं समजतंय. दक्षिण काश्‍मीरच्या हरमन भागात त्यांचा मृतदेह आढळला. कुलगाममध्ये राहणाऱ्या फयाज यांचे काल दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली होती. फयाज हे नुकतेच सैन्यात दाखल झाले होते. त्यांचे पोस्टिंग अखनूर युनिट येथे झाले होते. सुट्टी घेऊन ते आपल्या कुटुंबातील एका लग्नसोहळ्यासाठी शोपिया इथं गेले होते. त्यांचे लग्नमंडपातून बंदुकीचा धाक दाखवून दहशतवाद्यांनी अपहरण केले.