जेईई परीक्षा पास होऊनही तिनं केली आत्महत्या
जेईईच्या परीक्षेमध्ये पास होऊनंही गाझियाबादच्या 17 वर्षांच्या किर्ती तिवारीनं कोटामध्ये आत्महत्या केली आहे.
जयपूर: जेईईच्या परीक्षेमध्ये पास होऊनंही गाझियाबादच्या 17 वर्षांच्या किर्ती तिवारीनं कोटामध्ये आत्महत्या केली आहे. आयआयटीसाठी 100 मार्कांची आवश्यकता असताना किर्तीला 144 मार्क मिळाले होते. पण या मार्कांबाबत ती खुश नव्हती म्हणून तिनं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये किर्तीनं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
किर्तीला खगोलशास्त्रज्ञ व्हायचं होतं, पण आईच्या इच्छेमुळे तिनं सायन्सला प्रवेश घेतला. किर्तीही दोन वर्षांपासून कोटामध्ये शिक्षणासाठी राहत होती. तिचे वडिल जीमला गेले असताना घरात कोणी नाही असे पाहून किर्तीनं बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली.