अनुदानित गॅस सिलेंडरचे भाव वाढले
अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ५.५७ रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबई : अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ५.५७ रुपयांची वाढ झाली आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये तब्बल १४.५० रुपयांची कपात झाली आहे.
दरांमध्ये झालेल्या या बदलामुळे अनुदानित गॅस सिलेंडर आता ४४०.५० रुपयांना मिळेल तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर आता ७२३ रुपयांना मिळेल. याआधी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये निवडणुकांच्या तोंडावर सिलेंडरच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते.
फेब्रुवारीच्या आधी सलग आठ महिने गॅस सिलेंडरचे दर २ रुपयांनी वाढवण्यात आले होते. गॅस सिलेंडरवर मिळणारं अनुदान हळू हळू कमी करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.