अनुदानित सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ
अनुदानित सिलेंडरच्या 14.2 किलोच्या किंमतीमध्ये 1.93 रुपयांनी वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : अनुदानित सिलेंडरच्या 14.2 किलोच्या किंमतीमध्ये 1.93 रुपयांनी वाढ झाली आहे. मागच्या एका महिन्यातली सिलेंडरच्या किंमतीमधली ही दुसरी वाढ आहे. याआधी सिलेंडरचे भाव 1.98 रुपयांनी वाढले होते.
पेट्रोलियम पदार्थांचं अनुदान कमी करण्यासाठी सरकार प्रत्येक महिन्याला या भावांमध्ये वाढ करणार आहे. केरोसिनचा दरही 25 पैसे प्रतिलिटरनं वाढवण्यात आला आहे. या वाढलेल्या भावांची लगेचच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
अनुदानित सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली असतानाच विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीमध्ये तब्बल 50.5 रुपयांची घट करण्यात आली आहे.