सलमान खानला सुप्रीम कोर्टाची नोटीस
हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टानं नोटीस पाठवली आहे.
नवी दिल्ली: हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टानं नोटीस पाठवली आहे. 2002 च्या हिट अँड रन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सलमानची निर्दोष मुक्तता केली होती. त्याविरोधात राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली, त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं सलमानला नोटीस पाठवली आहे.
या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टामध्ये सलमानची बाजू काँग्रेस नेते आणि वकिल कपील सिब्बल यांनी मांडली. तर महाराष्ट्र सरकारकडून मुकुल रोहातगी यांनी राज्य सरकारची बाजू मांडली.
हिट अँड रन प्रकरण घडलं तेव्हा सलमानच गाडी चालवत होता, याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत, अशी बाजू राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात मांडण्यात आली. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं सलमानला नोटीस पाठवली आहे.