अॅम्बी व्हॅली बे`सहारा`, लिलावाचे कोर्टाचे आदेश
गुंतवणुकदारांचे 24 हजार कोटी न दिल्याप्रकरणी सहारा समुहाला सर्वोच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे.
नवी दिल्ली : गुंतवणुकदारांचे 24 हजार कोटी न दिल्याप्रकरणी सहारा समुहाला सर्वोच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सहारा समुहाची प्रॉपर्टी अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर न्यायालयानं 28 एप्रिलला सहारा प्रमुख सुब्रोतो राय यांना दुपारी 2 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.