नवी दिल्ली : श्रीमंत देवस्थानापैकी एक महाराष्ट्र राज्यातील अहमदनगरमधील शिर्डी साई संस्थानचा कारभार आयएएस अधिकाऱ्याच्या हाती सोपवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाच्या या नव्या आदेशामुळे वर्षाला 400 कोटींचं उत्पन्न असणाऱ्या साई संस्थानाचा कारभार 15 मार्च 2017 पासून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या हाती सोपवावा लागणार आहे. अडीच वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने साईबाबा संस्थानाचा कार्यकारी अधिकारी अधिकारी आयएएस दर्जाचा असावा, असा निर्णय दिला होता. 


मात्र राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेत त्या निर्णयावर स्थगिती आणली होती. मात्र सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवलाय. वार्षिक 400 कोटी उत्पन्न असणाऱ्या साई संस्थानाकडे आज 1826 कोटी रुपयांच्या विविध बँकांत ठेवी असून, 371 किलो सोने, तर 4340 किलो चांदी आहे.