डान्सबार कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या डान्सबार कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे डान्सबार मालकांना दणका बसला आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या डान्सबार कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे डान्सबार मालकांना दणका बसला आहे.
मात्र डान्सबारमध्ये मद्यबंदी करायची असेल तर संपूर्ण राज्यातच दारूबंदी लागू करा, अशा शब्दात न्यायलयाने राज्य सरकारला फटकारले आहे.
इंडियाना, अॅरो पंजाब आणि साई प्रसाद या तीन डान्सबारला आधीच्या नियमानुसार परवाने देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. नव्या डान्सबार कायद्यातल्या नियम आणि अटी जाचक असल्यामुळे कायद्याला स्थगिती देण्याची मागणी डान्स बार मालकांनी केली होती.
तर कायद्यातील नियम हे बार बालाच्या हिताचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गरजेचे असल्याचं महाराष्ट्र सरकारचा युक्तीवाद होता. आता यावर पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर घेण्यात येणार आहे.