नवी दिल्ली : रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी स्लिपर आणि जनरल रेल्वे प्रवाशांसाठी ई-बेडरोल सुविधा सुरु केलेय. सुरुवातीला हा पायलट प्रोजेक्ट असेल. तो राजधानीमधील नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दिन या दोन स्टेशनमध्ये उपलब्ध करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IRCTCच्या माध्यमातून विशेष काऊंटर खोलण्यात येईल. याच्यामाध्यमातून बेडरोल मिळू शकतील. याआधी ७ फेब्रुवारीला चेन्नईतील रेल्वे स्टेशन आणि तिरुवनंतपूरममध्ये ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.


प्रवासादरम्यान प्रवाशांना दोन बेडशीट आणि दोन उश्यांसाठी १४० रुपये द्यावे लागतील. तसेच ११० रुपयांत ब्लॅकेंट मिळेल. ही सुविधा कन्फर्म तिकिट दाखविल्यानंतर किंवा ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर रेल्वे सुटण्याच्याआधी ४ तासपूर्वी ते तुम्हाला मिळेल.