सुषमा स्वराज यांच्या किडन्या फेल, `एम्स`मध्ये इलाज
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या किडनी खराब झाल्याचं त्यांनी टवीट करून सांगितलं, किडनी ट्रान्सप्लांटसाठी माझ्या टेस्ट केल्या जात आहेत, भगवान कृष्णांचा मला आशीर्वाद गरजेचा आहे, मी दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या किडनी खराब झाल्याचं त्यांनी टवीट करून सांगितलं, किडनी ट्रान्सप्लांटसाठी माझ्या टेस्ट केल्या जात आहेत, भगवान कृष्णांचा मला आशीर्वाद गरजेचा आहे, मी दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सुषमा स्वराज यांना आरोग्य लाभण्याची कामना केली आहे. माझ्या शुभकामना आपल्यासोबत आहेत, तुम्ही लवकर बरे व्हाल, असं वसुंधरा राजे यांनी म्हटलं आहे.
सुषमा स्वराज यांना काही दिवसाआधी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे, प्रोफेसर बलराम एरन त्यांच्यावर इलाज करत आहेत.