आग्रा : आग्रास्थित प्रसिद्ध ताजमहल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्यानं इथं मोठी सुरक्षा तैनात करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीस या दहशतवादी संघटने विरोधात जगभरातून एकजूट होत असतानाच भारतामध्ये कारवाया करण्यासाठी ही दहशतवादी संघटना प्रयत्नशील आहे. भारताला आयसीसचा धोका कायम आहे. आयसीसशी निगडीत एका संघटनेच्या अहवालात हल्ल्याची धमकी देण्यात आलीय.


एव्हढंच नाही तर ताजमहल टार्गेटवर दाखवण्यात आलाय. दहशतवादी संघटनांच्या ऑनलाईन घडामोडींवर नजर ठेवणा-या अमेरीकेच्या साईट इंटिलिजन्स ग्रुपने आपल्या वेबसाईटवर हा फोटो दाखवला आहे.


हा फोटो उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आयएसच्या एका दहशतवाद्याला सैफुल्लाच्या पोलिसांनी तसंच एटीएसनं चकमकीत ठार केल्यानंतर जवळपास आठवड्याभरानं जाहीर करण्यात आलाय.