ताज महालच्या मिनाराचा घुमट कोसळला?
आग्रा : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्र्यातील ताज महालच्या चार मिनारांपैकी एकाचा घुमट सोमवारी सकाळी कोसळल्याची घटना घडली आहे.
आग्रा : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्र्यातील ताज महालच्या चार मिनारांपैकी एकाचा घुमट सोमवारी सकाळी कोसळल्याची घटना घडली आहे. काही प्रत्यक्षदर्शींनीच ही माहिती दिली आहे.
पण, उपस्थित अधिकाऱ्यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. त्यांच्या मते भारतीय पुरातत्व खात्यातर्फे सध्या ताज महालचे नुतनीकरण करण्यात येत आहे. हा घुमट कोसळला नसून त्याची स्थिती कमजोर असल्याने तो मुद्दामच बाजूला काढण्यात आला आहे.
गेले काही दिवस संगमरवरावर साचलेल्या धुळीला स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. त्यामुळेच तो जाणीवपूर्वक बाजूला काढून ठेवल्याचा दावा केला आहे.
गेली काही वर्ष ताज महालला संभावणाऱ्या पर्यावरणीय धोक्यांची चर्चा केली जात आहे. ताज महालाच्या अनेक भागांची झीज होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.