चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांची आज सत्वपरीक्षा आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. यामध्ये पलानीस्वामी यांना विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यायचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

AIADMKचं विधानसभेतलं संख्याबळ पाहता पलानीस्वामींना त्यात फार अडचण येण्याची शक्यता नाही. माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या मागे नेमके किती आमदार आहेत, हे आज स्पष्ट होईल. 234 आमदारांच्या विधानसभेत पलानीस्वामींच्या बाजूनं शुक्रवारी सकाळपर्यंत 124 सदस्य होते. मात्र माजी पोलीस महासंचालक असलेले आर. 


नटराजन यांनी त्यांची साथ सोडली आणि ठरावाच्या विरोधात मतदान करणार असल्याचं जाहीर केलं. DMKनं पलानीस्वामींना विरोध करायचा निर्णय घेतलाय, तर काँग्रेसनं हायकमांडकडे विचारणार केलीये. त्यामुळे 8 आमदार असलेल्या काँग्रेसची भूमिकाही महत्त्वाची आहे.