तामीळनाडू: इरोडमधल्या एका न्यायाधिशानं आपल्या दलित महिला सहाय्यकाला मेमो दिला आहे. हा मेमो द्यायचं कारणही धक्कादायक आहे. या महिला सहाय्यकानं न्यायाधिशांची अंतर्वस्त्र न धुतल्यानं आणि त्यांच्या पत्नीची हुज्जत घातल्यानं हा मेमो देण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिन्याभरापूर्वी हा मेमो देण्यात आला आणि त्यावर सत्यमंगलम कोर्टाचे  न्यायाधिश डी सेल्व्हम यांनी सही देखील केली आहे.


तुम्ही न्यायाधिशांची अंतर्वस्त्र का धुतली नाहीत, याबाबत न्यायाधिश आणि त्यांच्या पत्नीनं विचारलं असता तुम्ही त्यांच्याशी चढ्या आवाजात हुज्जत घातलीत, त्यामुळे तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याचं 7 दिवसांमध्ये उत्तर द्या, अशा आशयाचा हा मेमो आहे.


पुढच्या वेळपासून मी माझं काम चोख पार पाडीन, आता माझ्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असं उत्तर महिलेनं मेमोला दिलं आहे. पण कार्यालयीन कर्मचाऱ्याचा घरच्या कामांसाठी वापर करणं योग्य आहे का, याबाबत मात्र जज डी. सेल्व्हम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 


तसंच याप्रकरणी न्यायाधिशांची सहाय्यक वासंती यांनीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. न्यायाधिशांनी मे मध्ये सूत्र हातात घेतल्यानंतर ही महिला रोज संध्याकाळी 7 पर्यंत त्यांच्या घरी काम करते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.