कानपूर: 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या शरीरातून प्रेत आत्मा काढण्यासाठी तिच्या शरीरावर गरम सळईचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार हा कानपूरमध्ये घडला आहे. या मुलीच्या शरीरात प्रेत आत्मा आहे असं तांत्रिकने तिच्या घरच्यांना सांगितले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्यासुंदर चेहऱ्यावर तांत्रिकने अगरबत्तीचे चटके दिले. हा त्रास असह्य झाल्यावर ती मुलगी आोरडायची त्यामुळे तिचा आवाज कोणी ऐकू नये म्हणून तो तांत्रिक तिला मारहाण करायचा.
 
हे सर्व तिच्याबरोबर घडत असताना ती मुलगी बेशुध्द पडली. हा सगळा प्रकार तिच्या घरच्यांना समजला असता, त्यांनी त्या तांत्रिकवर गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी तांत्रिकला अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे.