लुधियाना : ज्या तरुणावर आपण प्रेम करतोय त्याचं प्रेम मिळवण्यासाठी एका तरुणीनं चक्क तांत्रिकाची मदत घेतली... ही मदत तिला चांगलीच महागात पडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका तरुणावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या जमालपूरमध्ये राहणाऱ्या या १९ वर्षीय तरुणीनं तांत्रिकाची मदत घेतली होती. तांत्रिकाद्वारे तरुणाला भुरळ पाडून त्याला आपल्या प्रेमजाळात ओढण्याची या तरुणीची कामना होती. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी या तरुणीनं भारतनगर आणि बस स्टँड रोडवर मियाँ कलाम साहिब नावाच्या एका तांत्रिकाचं दुकानं गाठलं. तांत्रिकाला तिनं आपलं म्हणणं सांगितल्यानंतर त्यानं तिला संमोहन विद्येचा प्रयोग करत बेशुद्ध केलं. जेव्हा या तरुणीला शुद्ध आली तेव्हा ती तांत्रिकच्या केबिनमध्ये निव्रस्त्र अवस्थेत होती. आपल्यावर तांत्रिकानं त्याच अवस्थेत बलात्कार केल्याचं लक्षात येण्यासाठी तिला फार वेळ लागला नाही. 


यानंतर ही तरुणी पोलिसांकडे जाऊ नये, म्हणून तांत्रिकानं तिला धमकावलंही. परंतु, पीडित तरुणीनं आपल्या नातेवाईकांची मदत घेत पोलिसांकडे या घटनेची तक्रार नोंदवलीय. 


पोलिसांनी पीडित तरुणीच्या जबाबाच्या आधारावर तांत्रिकाल अटक करून केस दाखल केलीय.