मुंबई : टाटा समूहाच्या बहुचर्चित अध्यक्षपदावर अखेर नियुक्ती करण्यात आलीय. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि एमडी असलेले नटराजन चंद्रशेखरन यांच्याकडे टाटा समूहाची धुरा देण्यात आली आहे. टाटा समूहाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच बिगरपारशी व्यक्तीची निवड करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या सात वर्षांपासून चंद्रशेखरन हे टीसीएसच्या सेवेत आहेत, तसंच ऑक्टोबर 2016 पासून ते टाटाच्या बोर्डावरही आहेत. नव्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यासाठी पाच जणांच्या समितीनं स्थापन करण्यात आली होती. या समितीतन चार जणांचं नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यात रतना टाटांसह इतर तिघांची नावे होती. त्यातून अखेर चंद्रशेखर नटराजन यांची एकमतानं निवड करण्यात आली. टाटा समूहाच्या धोरणांशी फारकत घेतल्यामुळं सायरस मिस्त्री यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.