पुस्तकातून शिकवली जातेय महिलांची बेस्ट फिगर, सोशल मीडियावर संताप
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या शारीरिक शिक्षण विषयाच्या पुस्तकात चक्क महिलांसाठी ३६-२४-३६ फिगर उत्तम आहे असा दावा करण्यात आला आहे. या अजब उदाहरणामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर सडकून टीका होत आहे.
मुंबई : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या शारीरिक शिक्षण विषयाच्या पुस्तकात चक्क महिलांसाठी ३६-२४-३६ फिगर उत्तम आहे असा दावा करण्यात आला आहे. या अजब उदाहरणामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर सडकून टीका होत आहे.
एका धड्यात महिलांसाठी ३६-२४-३६ ही फिगर उत्तम असते असं म्हटले आहे. मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड सारख्या स्पर्धांमध्ये ही फिगर उत्तम मानली जाते असे उदाहरण या पुस्तकात देण्यात आले आहे. अशी फिगर हवी असेल तर नियमित व्यायाम करा असेही यात म्हटले आहे.
पुस्तकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियातून आता यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सीबीएसई बोर्डाने हे पुस्तक आपले नसल्याचा दावा केला आहे.