श्रीनगर : जीआरईफ कँपवर सोमवारी सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन कामगारांना मृत्यू झाला आहे. अखनूरजवळील बटल येथे हा दहशतवादी हल्ला झाला. अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. यानंतर दहशतवादी फरार झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार १.१५ मिनिटांनी GREF कँपवर हल्ला केला होता. या भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे. या घटनेनंतर शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. गावातील लोकांनी २ ते ३ दहशतवादी पाहिल्याचा दावा केला आहे.


जवानांची ड्यूटी बदलण्याच्या वेळेस हा हल्ला झाला. या दरम्यान येथे अनेक कामगार देखील होते. या भागात लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. बटल हा पाकिस्तानच्या सीमेशी लगत असलेला भाग आहे. जनरल रिजर्व इंजीनियर फोर्स आणि सीमा रस्ते संगठन (BRO) हे एकत्र सीमेशी लगत रस्ता निर्माण करण्याचं काम करतात. यानंतर सर्व छावण्यांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.