उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद
जम्मू काश्मीरच्या उरी इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे 5.30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला आहे.
उरी : जम्मू काश्मीरच्या उरी इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे 5.30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची माहिली मिळत आहे. लष्कराच्या 12 ब्रिगेड मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला आत्मघातकी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यालयात तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याचा अंदाज आहे. स्फोटांचे आवाज ऐकू आल्यानंतर लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरु केला आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरु आहे.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका आणि रशिया दौरा त्यांनी रद्द केला आहे. या हल्ल्यात 8 जवान जखमी झालेत. त्यांना हेलीकॉप्टरनं श्रीनगरला हलवण्यात आलं आहे. हल्ल्याच्या ठिकाणी पॅरा मिलिट्री फोर्सचे विशेष पथक हेलीकॉप्टरने उतरवण्यात आलं आहे.