साधुच्या वेशात यूपीमध्ये घुसले दहशतवादी, मुख्यमंत्री योगी निशान्यावर
योगी आदित्यनाथ यांचं कार्यालय दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे. साधु संतांच्या वेशात दहशतवादी हल्ला करु शकतात. यूपीमधील अनेक इमारती, मुख्यमंत्री कार्यालय, विमानतळ आणि ऐतिहासिक जागा दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे.
लखनऊ : योगी आदित्यनाथ यांचं कार्यालय दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे. साधु संतांच्या वेशात दहशतवादी हल्ला करु शकतात. यूपीमधील अनेक इमारती, मुख्यमंत्री कार्यालय, विमानतळ आणि ऐतिहासिक जागा दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे.
साधु संतांच्या वेशात दहशतवादी यूपीमध्ये घुसले असल्याची माहिती आहे. हे दहशतवादी नेपाळच्या मार्गे बांग्लादेश आणि मग भारतात घुसले आहेत. यूपी पोलीसा सीक्रेट अलर्टवर आहे. एमपी पोलीसच्या इंटेलिजेंस यूनिटने माहिती दिल्यानंतर यूपीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व आयजी, डीआयजी, जिल्ह्याचे एसपी, रेल्वे पोलीस यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांना देखील अलर्ट करण्यात आलं आहे.
१७-१८ वर्षाचे हे दहशतवादी आहेत. यांना हिंदू धर्माच्या रिति-रिवाजांचं ट्रेनिंग देण्यात आलं आहे. हे लोकं साधु संत किंवा तांत्रिकाच्या वेशात राहतात. यावर्षी फेब्रुवारीमध्ये 20-25 युवक दहशतवाद्यांना भारत-नेपाळ बॉर्डरवरुन युपीमध्ये पाठवण्यात आलं आहे. हिंदू बहुल भागात हिंदूमध्ये हे राहत आहेत. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांपासून वाचण्यासाठी त्यांनी आपलं नाव देखील हिंदू पद्धतीने ठेवलं आहे.
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार अयोध्या, काशी, मथुरा, आग्रा, ताजमहल, इलाहाबाद आणि लखनऊ हायकोर्ट बिल्डिंग, विधानभवन, सचिवालय, रेल्वे स्टेशन आणि गर्दीचे ठिकाण असलेले ठिकाणं दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहेत.