भारताची `अग्नि २` मिसाईल परिक्षेत नापास!
अण्वस्रांना वाहून नेण्याची क्षमता असलेल्या `अग्नि २` मिसाईलचं ओडिशातील एका बेटावरून परीक्षण करण्यात आलं. परंतु, ही परीक्षा पास करण्यात `अग्नि २`ला यश मिळालं नाही.
बालेश्वर, ओडिशा : अण्वस्रांना वाहून नेण्याची क्षमता असलेल्या 'अग्नि २' मिसाईलचं ओडिशातील एका बेटावरून परीक्षण करण्यात आलं. परंतु, ही परीक्षा पास करण्यात 'अग्नि २'ला यश मिळालं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पृष्ठभागापासून ते पृष्ठभागापर्यंत मारा करणारी या मिसाईलचं परीक्षण अब्दुल कलाम बेटावर सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी करण्यात आलं. याचं परीक्षण एकीकृत चाचणी श्रेणीवर (आयटीआर) मोबाईल लॉन्चरच्या साहाय्यानं करण्यात आलं. परीक्षणा दरम्यान ही मिसाईल अपेक्षित मानदंड करण्यात अयशस्वी ठरल्याचं सांगण्यात येतंय.
'अग्नि २'ची लांबी २० मीटर आहे आणि या मिसाईलचं वजन १७ टन आहे. ही मिसाईल २००० किलोमीटरपर्यंत १००० किलोग्राम विस्फोटक घेऊन जाऊ शकते.