नवी दिल्ली : पीओकेमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर सरकारने नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने महाराष्‍ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये नौदलाला अधिक अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार सरकारने नौदलाला इतर ऑपरेशन रोखण्यास सांगितलं असून सांगितलं आहे की, १ आणि २ ऑक्टोबरला एनसीसी कॅडेट आणि लष्काराच्या शाळेतील मुलांना देखील समुद्रापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. यासोबतच नागरिकांना देखील समुद्रापासून दूर राहण्याचे सूचना देण्याचे आदेश दिले आहेत.


काल रात्री लाईन ऑफ कंट्रोलच्या पलिकडे असणारे दहशतवादी तळ लष्कराने उद्ध्वस्त केले. काल दहशतवाद्यांच्या काही टोळ्या भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होत्या यावेळी लष्करानं नियंत्रण रेषेपलिकडे दोन किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांचे सात तळ उधळून लावले. त्यासाठी हेलिकॉप्टरनं सैनिकांना पाकिस्तान नियंत्रित भागात उतरवण्यात आलं. या सैनिकांनी दहशतवादी तळांवर हल्ले चढवून पहाटे सहा वाजता ऑपरेशन यशस्वी केलं. त्यामुळे आता पाकिस्तान याविरुद्ध काहीतरी कारवाई करु शकतो त्यामुळे सगळ्यांना अलर्ट करण्यात आलं आहे.