नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आदर्श इमारत ताब्यात घ्या, असे आदेश आज केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आदर्शमधील रहिवाशांना फ्लॅट खाली करावे लागणार आहेत.


मुंबईतील आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ५ ऑगस्टपूर्वी आदर्श इमारतीचा ताबा घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचे पाडकाम करु नका, असेही न्यायालयाने आदेश देताना म्हटले आहे. 
 
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने आदर्श इमारत पाडण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाविरोधात आदर्श सोसायटीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी पुढील सुनावणी ५ ऑगस्टला होणार आहे.
 
आदर्श सोसायटीतील आरोपांवरुन काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.