रेवाडी : अपुऱ्या आणि निष्कृष्ठ दर्जाच्या जेवणाची सोशल मीडियावर पोलखोल करणाऱ्या बीएसएफ जवान तेजबहादूर यादव यांच्या मृत्यूची चर्चा सध्या सोशल मीडिया आणि व्हॉटसअपवर सुरू आहे. परंतु, यामागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या केवळ अफवा असल्याचं समोर येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेजबहादूर यांच्या पत्नीशी संपर्क केल्यानंतर त्यांनी या बातम्या केवळ अफवा असल्याचं म्हटलंय. तेजबहादूर यांच्या मृत्यूची अफवा त्यांच्या कुटुंबियांपर्यंतही पोहचली होती... तेव्हा त्यांच्या पत्नीला आणि इतर कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला होता. परंतु, ही केवळ अफवा असल्याची खात्री केल्यानंतर त्यांच्या जीवात जीव आला. 


तेजबहादूर यादव यांनी फोनवरून आपण सुरक्षित असल्याचं त्यांच्या कुटुंबियांना सांगितलंय. सोशल मीडियावर जखमी अवस्थेतील तेजबहादूर सिंग नावानं सध्या व्हायरल होत असलेला फोटो म्हणजे पाकिस्तानातून केलं जाणारं कटकारस्थान असल्याचं सांगितलं जातंय.