नवी दिल्ली : याआधी कधीही सर्जिकल स्ट्राईक्स करण्यात आलेले नाहीत. ज्यावेळेला कारवाई केले जाते त्यावेळी जवान थोड्याफार प्रमाणात एलओसी पार करतात, पण त्याला आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणू शकत नाही. असं मत माजी डीजीएमओ विनोद भाटिया यांनी मांडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2011 ते 2014 या काळात कमीत कमी तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक केल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं. त्यावर भाटिया यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भाटिया 2012 ते 2014 या काळात डीजीएमओ पदी कार्यरत होते.


1 सप्टेंबर 2011, 28 जुलै 2013 आणि 14 जानेवारी 2014 या तीन दिवशी काँग्रेसच्या कार्यकाळात  यशस्वी सर्जिकल स्ट्राईक्स करण्यात आले होते. असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी म्हटलं.


काही दिवसांपूर्वी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीही 2013 साली काँग्रेसच्या काळात सर्जिकल स्ट्राईक केल्याचं म्हटलं होतं. 29 सप्टेंबर 2016 ला करण्यात आलेली कारवाई म्हणजे परफेक्ट सर्जिकल स्ट्राईक असल्याचं भाटिया यांनी यावेळी सांगितलं.


काँग्रेस किंवा इतर पक्षांकडून केली जाणारी विधानं आणि इतरही क्षेत्रातल्या व्यक्तींकडून येणा-या प्रतिक्रियांमुळे भारतीय लष्कराचं मनोधैर्य खचवणारं आहे. अशा प्रतिक्रिया न देता लष्कराला त्यांचं काम धैर्यानं करू द्यावे ते जे करतायत ते योग्यच आहे असंही यावेळी भाटिया यांनी सुनावलंय.