मुंबई : देशातील सर्वात जलद असणाऱ्या 'गतिमान एक्सप्रेस'ला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीत हिरवा झेंडा दाखवला. दिल्ली ते आग्रा हे १८८ किलोमीटरचे अंतर ही ट्रेन केवळ १०० मिनिटांत पार करेल अशी या ट्रेनची क्षमता आहे. या ट्रेनचा कमाल वेग ताशी १६० किलोमीटर इतका आहे. कोणत्या आहेत आपल्या देशातील सर्वात वेगवान गाड्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. नवी दिल्ली - भोपाळ शताब्दी एक्सप्रेस 




भारतातील ही सर्वात जलद ट्रेन आहे. या ट्रेनची सुरुवात १९८८ साली दिल्ली ते आग्रा या मार्गावार झाली. पुढे गाडी ग्वालेयरपर्यंत नेण्यात आली आणि सध्या ती भोपाळपर्यंत धावते. या गाडीचा कमाल वेग ताशी १५० किलोमीटर इतका आहे. 


२. हजरत निजामुद्दीन - बांद्रा गरीब रथ 




या ट्रेनची सुरुवात २००५ साली झाली. १,३६६ किलोमीटरचे अंतर ही ट्रेन १६ तासांत पार करते. या गाडीचा सरासरी वेग १३० किलोमीटर प्रति तास इतका आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या तिकीटांची किंमत सामान्य आहे.


३. सियालदाह - नवी दिल्ली दुराँतो एक्सप्रेस




पश्चिम बंगाल आणि नवी दिल्ली दरम्यान धावणारी ही ट्रेन कोणत्याही स्थानकांवर थांबत नाही. या गाडीला सर्वात जास्त वेळ वाचवणारी गाडी असल्याचं मानलं जातं. या गाडीचा साधारण सरासरी वेग ९१ किलोमीटर प्रति तास आहे. 


४. नवी दिल्ली - मुंबई राजधानी एक्सप्रेस 




१९७२ साली या ट्रेनची सुरुवात झाली. देशातील ही सर्वात जलद ट्रेन आहे. विद्युतीकरण झाल्यानंतर या ट्रेनचा वेग ९०.४६ किलोमीटर प्रति तास इतका झाला आहे. 


५. नवी दिल्ली - हावडा राजधानी एक्सप्रेस




भारतात जेव्हा राजधानी एक्सप्रेसची सुरुवात झाली तेव्हा पहिली राजधानी हावडा आणि नवी दिल्ली दरम्यान धावली. पूर्णपणे वातानुकुलित असणारी ही पहिली ट्रेन आहे. या गाडीचा सरासरी वेग ताशी ८८.२१ किलोमीटर इतका आहे. १७ तास २० मिनिटांत ही गाडी दिल्ली ते हावडामधील १,४४५ किलोमीटरचे अंतर पार करते. 


६. नवी दिल्ली - अलाहबाद दुराँतो एक्सप्रेस




या गाडीच्या फेऱ्यांना २०१२ साली सुरुवात झाली. या गाडीचा सरासरी वेग ताशी ८६.८५ किलोमीटर आहे. या गाडीला राजधानी ट्रेनचे काही कोचेस काही बदल करुन लावण्यात आले आहेत.